मन देउन ऐकत जावे
स्मरणात सार ठेवावे
लेखन हा उपाय खासा
अभ्यास करावा ऐसा!१
नावडते हो आवडते
अवघड ना काही वाटे
उत्साह जोडता श्वासा
अभ्यास करावा ऐसा!२
कवितांना लावा चाली
गा प्रेमे वेळोवेळी
यश अपुले धरा भरवसा
अभ्यास करावा ऐसा!३
ना अशक्य काही जगती
भीतीने प्रश्न न सुटती
घ्या सच्छिष्याच्या ध्यासा
अभ्यास करावा ऐसा!४
जे लिहीन शुद्ध असेल
वाचता छान वाटेल
गुरु जवळी घेती शिष्या
अभ्यास करावा ऐसा!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४ डिसेंबर २००३
No comments:
Post a Comment