पांडुरंग भेटीसाठी पंचप्राण कंठी येती –
बळ सारे हारपले देह लोटोनियां देती!ध्रु.
भाववेडा नामदेव
स्मरू लागे ज्ञानदेव
अदृश्याची ओढ जीवा, आतां पाहिजे विश्रांती ! १
आता पावलो पंढरी
दिसे सावळा श्रीहरी
वृत्ती झाल्या अंतर्मुख नाही उरली आसक्ती ! २
आषाढाचा धुंद मास
लावी वेधु मानसास
मूळ आले माहेराचे बाहे चैतन्याची मूर्ती ! ३
चिरा पायरीचा व्हावे
संतें वरी पाय द्यावे
काय पाहिजे आणीक? नको स्वर्ग नको मुक्ती ! ४
धाव पाव गे विठ्ठले
प्राण माझे व्याकुळले
आधारास दे गे हात हाका तरी मारू किती ! ५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:
Post a Comment