दु:ख असो सौख्य असो
मजसि काय ते?
माझे मन रामचरणि नित्य राहते!ध्रु.
मजसि काय ते?
माझे मन रामचरणि नित्य राहते!ध्रु.
नील गगन
शीत पवन
घननीळचि हास्य करी असे वाटते! १
स्मरत राम
करित काम
नकळत मज रामभजन सहज साधते! २
राम नाम
सौख्य धाम
घडते त्या मी निमित्त चित्त जाणते! ३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २६५, २१ सप्टेंबर वर आधारित काव्य)
No comments:
Post a Comment