राम आहे रक्षिता, राम आहे रक्षिता!ध्रु.
काळजी कसली नको
भीति चित्ती लव नको
राम नाही तो निजेला, राम आहे मागुता!१
यत्न तो सोडू नये
गर्व शिरि वाहू नये
"मीपणा"सी सोडता, राम आहे रक्षिता!२
मीपणाने दुःख येते
देहबुद्धी त्रास देते
देहबुद्धी भंगिता, राम आहे रक्षिता?३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ८० (२० मार्च) वर आधारित काव्य.
भीति न बाळगावी चित्ती। रक्षण करणार आहे रघुपति।।
न करा काळजीला। राम नाही तो निजला।।
म्हणावा प्रपंच रामाचा झाला।।
जे जे मीपणाने केले। ते ते दुःखाला कारण झाले।।
देहबुद्धी धरून राही। त्याला कोठे सुख नाही।।
जेथे मीपणाचे ठाणे। तेथे दुःखाचे साम्राज्य असणे।।
ज्याला म्हणावे मी माझे। त्यावर सत्ता न माझी गाजे।।
म्हणून माझे मीपण। हेच दुःखाला कारण।
रामाचे होण्याने होईल निवारण ।।
No comments:
Post a Comment