नाम हेच साधन, साध्य ही नाम!ध्रु.
नरदेह प्राप्ती लाभ थोर झाला
राम ओळखावा ध्यास हा जिवाला
कृपावंत सद्गुरु देती वाट दाखवून!१
विषयकर्दमी अज्ञ जीव लोळे
अनुताप अंती तयालागि पोळे
सद्गुरु स्नेहल लाविती चंदन!२
पतिव्रतेसाठी पती हाच देव
साधकास जैसा गुरु हाच देव
आज्ञेचे पालन श्रेष्ठ हे पूजन!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १९९ (१७ जुलै) वर आधारित काव्य
आपण येथे कशाकरिता आलो हेच विसरलो आहोत. खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्मलो आहोत, ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय. विषयच जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार? विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ति करता येते. गुरु हा सर्वज्ञ आहे व तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे. गुरु तरी नाम हेच सत्य सांगतो आणि नामस्मरणास आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो. नाम हे साधन व तेच साध्य होय. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सर्व जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही.
No comments:
Post a Comment