हे प्रभो, शिकवी नित्य मला
श्रद्धा दे विमला ! ध्रु.
निराकार साकार तसा तू
जगती तैसा अंतरात तू
प्रगतिपथी ने मला ! १
यश आले तर नच हुरळावे
अल्प अपयशे मी न खचावे
योगबुद्धि दे मला ! २
सद्विचार पठणात असू दे
सत्कार्या प्रेरणा मिळू दे
चिंतनि रुचि दे मला ! ३
जीवनात जर गीता आली
दीपावलि तर सुंदर झाली
दाखव सुखसोहळा ! ४
धागा धागा अखंड विणता
विविधतेत मज दिसो एकता
राम विनवी हे तुला ! ५
सदाशिव पेठेतील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात बाल संस्कार वर्गात हे गीत समूह गान म्हणून भैरवी मध्ये म्हटले जात असे.
No comments:
Post a Comment