Tuesday, March 26, 2019

श्री एकनाथ..

सद्गुरु जनार्दनस्वामी
ते भरले अंतर्यामी
मन मजविषयी कळवळले
'एका'स आपले केले!ध्रु.

ती नाममाळ मम कंठी
हृदयात गोजिरी मूर्ती
भ्रांतीचे निरसन झाले!१

मी देहच विकला माझा
मी प्राण अर्पिला माझा
ते द्वैत लयाला नेले!२

लेखणी दिली मम हाती
सद्गुरूच लिहवुनि घेती
मन भागवती रमलेले!३

ये रामकथा आकारा
करुणा ये श्रीरघुवीरा
भावार्था शब्द ही दिधले!४

नामात वसे भगवंत
हरिभक्त खरा श्रीमंत
रात्रंदिन चिंतन स्फुरले!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment