प्रभातकाली रमण महर्षी अंतरात आला
या देही गुरुकृपा भोगवी मुक्तीचा सोहळा!
अरुणाचल शिव, अरुणाचल शिव
समीकरण, आगळाच अनुभव
देहो नाहं, कोsहं सोsहं प्रेमभरे वदला!१
पदयात्रा नित करीत असता
स्वरूपचिंतन हातुनि घडता
सर्वात्मक भक्ताला केले, कंठ म्हणुन दाटला!२
मौन हरीचे सुमधुर भाषण
मिटता डोळे स्वरूप दर्शन
इथे-तिथे जो तो परमात्मा अंतरि जाणवला!३
जेथुनि आलो तिथे जायचे
पुन्हा न तेथुन परतायाचे
परंधाम निर्देश महर्षे कौशल्ये केला!४
हृदयी करुणा स्पर्शी अमृत
दुनिया निद्रित आपण जागृत
स्वसंवेद्य ते आपण केले तळहाती आवळा!५
न बोलता ही बोध वितरता
शिरी कृपेचा हस्त ठेवता
अनुग्रहाने बद्ध कधीचा पूर्णमुक्त झाला!६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
या देही गुरुकृपा भोगवी मुक्तीचा सोहळा!
अरुणाचल शिव, अरुणाचल शिव
समीकरण, आगळाच अनुभव
देहो नाहं, कोsहं सोsहं प्रेमभरे वदला!१
पदयात्रा नित करीत असता
स्वरूपचिंतन हातुनि घडता
सर्वात्मक भक्ताला केले, कंठ म्हणुन दाटला!२
मौन हरीचे सुमधुर भाषण
मिटता डोळे स्वरूप दर्शन
इथे-तिथे जो तो परमात्मा अंतरि जाणवला!३
जेथुनि आलो तिथे जायचे
पुन्हा न तेथुन परतायाचे
परंधाम निर्देश महर्षे कौशल्ये केला!४
हृदयी करुणा स्पर्शी अमृत
दुनिया निद्रित आपण जागृत
स्वसंवेद्य ते आपण केले तळहाती आवळा!५
न बोलता ही बोध वितरता
शिरी कृपेचा हस्त ठेवता
अनुग्रहाने बद्ध कधीचा पूर्णमुक्त झाला!६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment