Tuesday, June 2, 2020

मनोबोध गावा प्रभाती प्रभाती....

समर्थकृपा तू जरी इच्छितोसी
मना माझिया ध्यास तू का न घेशी?
तुझे सद्गुरू यावया नित्य भेटी
मनोबोध गावा प्रभाती प्रभाती १

तुझी साधना नित्य नेमे घडू दे
तुझी वासना रामरूपी विरू दे
खरा जीवनी राम येण्याच साठी
मनोबोध गावा प्रभाती प्रभाती २

तुझा मीपणा सर्व दुःखास मूळ
तुझा मीपणा सर्व वादास मूळ
जुने ठेवणे ते पुन्हा लाभण्यासी
मनोबोध गावा प्रभाती प्रभाती ३

बरा निश्चयो शाश्वताचा करावा
मना मृत्यु याच्याचसाठी स्मरावा
तुला लाभण्या नित्य यत्नार्थ स्फूर्ती
मनोबोध गावा प्रभाती प्रभाती ४

सुखानंद आनंद भेदे उडाला
खरा भक्त आनंदडोही बुडाला
मना सज्जना सद्गुरू सांगताती
मनोबोध गावा प्रभाती प्रभाती ५

समर्थाचिया सेवके ना कुढावे
समर्थाचिया सेवके ना रडावे
पुढे भक्तिमार्गे सुखे चालण्यासी
मनोबोध गावा प्रभाती प्रभाती ६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१०.१.१९८६

No comments:

Post a Comment