पितृदेव हे त्रिवार वंदन! त्रिवार वंदन!!
त्रिवार वंदन!!!
झिजला ऐसे जीवनभर की तुम्हां पाहुनी लाजे चंदन!ध्रु.
कृतज्ञतेने मन भारावे
काय लिहावे? कैसे गावे?
तात आपले पुत्र नि कन्या -
हृदयी जपती मधुर आठवण!१
कठोर प्रेमा! अबोल प्रेमा!
डोळस प्रेमा! अमोल प्रेमा!
डोकावा ना एकच क्षणभर -
हृदयच झाले निर्मळ दर्पण!२
अपुल्या ठायी देव प्रकटला
कौतुक-संयम संगम झाला
निर्गुण झाला त्याच क्षणी हो
जाणवलेले गोड जवळपण! ३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१०.३.१९७५ माघ वद्य १३
सारंग, केरवा (संथ वाहते)
No comments:
Post a Comment