विषयांकडची धाव थांबवुनि वळव मना माघारी
साधका, वळव मना माघारी!ध्रु.
साधका, वळव मना माघारी!ध्रु.
प्रातःकाली जागे व्हावे
आसन घालुनि स्थिर बैसावे
श्वासोच्छ्वासा ऐकत राही -
दीर्घ श्वसना करी!१
धरिता सो ध्वनि, सोडता अहम्
अखंड चाले सोऽहं सोऽहम्
सहज जप असा जपता जपता
मूक होत वैखरी!२
जगास विस्मर अनुसंधाने
मना शांतवी सोऽहं ध्याने
सरली धावाधावहि सगळी
राजपथा पत्करी!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१८.०२.१९७४
(परतोनी पाठीमोरे ठाके
आणि आपणियाते आपण देखे
देखतखेवो वोळखे
म्हणे तत्त्व हे मीचि
तिये वोळखीचिसरिसे
सुखाचिया साम्राज्यी बैसे
मग आपणपा समरसे
वीरोनि जाय
या ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आधारित काव्य. ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या प्रवचनावर आधारित)
No comments:
Post a Comment