शाश्वत सुख जर हवे -
देत ते शाश्वत परमात्मा!ध्रु.
देत ते शाश्वत परमात्मा!ध्रु.
विषयांचे सुख ते कसले सुख?
विषय लाभता फिरवितसे मुख
विषय अशाश्वत कैसे येती
जीवाच्या कामा?२
विषय ही भंगुर, देह हि भंगुर
एकचि शाश्वत तो परमेश्वर
बद्ध जीव मी विसरुनि जाण्या
ध्यावा परमात्मा!३
आत्मरूप हा जीव बनावा
विसरुनि जावे शरीरभावा
सोऽहं सोऽहं हे घोकावे
तोषावा आत्मा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.०७.१९७४
(किंबहुना सोये
जीव आत्मयाची आहे
तेथ जे होये
तया नाव सुख
ज्ञानेश्वरीतील या ओवीवर आधारित काव्य. स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या प्रवचनावर आधारित)
No comments:
Post a Comment