श्रीराम
'श्रीराम' जाहला नाम
ते नाम परमसुखधाम ! ध्रु.
'श्रीराम' मुखाने गाता
'श्रीराम' मनाने ध्याता
पडतसे जिवा आराम!१
'श्रीराम' करातिल काम
'श्रीराम' गळ्यातिल गान
सोऽहं चे स्फुरवी भान !२
विश्वात वसे 'श्रीराम'
हृदयातहि तो 'श्रीराम'
निशिदिनी आळवी नाम!३
अभ्यासा बसता बसता
मन वळुन अंतरि रिघता
सापडला आत्माराम !४
श्रीरामनाम नवलाई
दुःखाची वार्ता नाही
सुखनिधान मंगलनाम!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३ डिसेंबर १९८९
No comments:
Post a Comment