'सोऽहं हंसः'
'श्रीराम'
'श्रीराम'
मजवाचुनि जगि नाहीं काही!ध्रु.
देव भक्त हे एक तत्त्वत:
जीव न कोणी मजहुनि परता
परब्रह्म तो होउनि राही!१
जनसामान्या हेच कळेना
कळलें जें तें लवहि वळेना
वृथाचि बुडती सग संदेहीं!२
निद्रित जीवा जागृति यावी
गुरुकृपेची कळो थोरवी
स्मरुनि स्वरूपा विमुक्त होई!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
११/१२/१९७४
तैसा मी एकवांचूनि कांहीं।
मग भिन्नाभिन्न आन नाहीं।
सोऽहं बोधे तयाच्या ठायीं।
अनन्यु होय ॥ [ १८ १३९७]
या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १९२ वर आधारित हे काव्य.
No comments:
Post a Comment