सद्गुरु सदैव असती जवळी श्रद्धा धरणे विमला!ध्रु.
संतांचे घरि नुसते पडले
तरी न कांहीं वाया गेले
शुद्ध भाव येईल अंतरी वाणीही कोमला!१
देहांतरि वा देहातीत
सद्गुरु असती कालातीत
भगवन्नामी निवास त्यांचा नित्याचा राहिला!२
वृत्ती रामाकडे लावणे
स्वास्थ्य मनाचे नित्य राखणे
सदा हसतमुख राही तो नर रामरूप झाला!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्र. १८८, ६ जुलै वर आधारित काव्य.
No comments:
Post a Comment