वासना सोडुनी द्याव्या, देव बोलेल!
देव बोलेल!ध्रु.
देव बोलेल!ध्रु.
रामासी सतत स्मरावे
रामासी ध्यावे गावे
मग कृपामेघ वर्षेल!१
वासना मीपणा देते
अस्वलापरी नाचविते
जर स्वतःस कुणि विसरेल!२
सृष्टी हे ईश्वरि रूप
अंतरात सौख्य अमूप
स्वानंद कुणी चाखेल!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २२५. (१२ ऑगस्ट) वर आधारित काव्य.
मनातील सर्व वासना सोडून द्याव्या म्हणजे भगवंत बोलू लागतो. वासना कितीही सात्विक असली तरी मीपणा येण्यास ती कारणीभूत होते हे लक्षात ठेवावे. नामाचा विसर नाही पडला म्हणजे स्वतःला विसरता येते. सृष्टी म्हणजे भगवंताच्या आनंदाचे व्यक्त स्वरूप. आपला आनंद आपणच भोगल्याशिवाय आनंदाची मजा नाही. जो फक्त स्वतःलाच आवडतो तो वाईट मनुष्य होय. मनाला रिकामे ठेवले की ते विषयाच्या मागे धावलेच समजा. याकरिता आपले मन नेहमी गुंतवून ठेवावे.
No comments:
Post a Comment