अध्याय १३ : क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग
शरीर हे क्षेत्र जगी बोलतात
क्षेत्र जाणणारा असे आत्मा ।।१।।
दोन्हीचेही ज्ञान तेच आत्मज्ञान
जाण हे अर्जुना आवर्जून ।।२।।
देह येई जाई असे तो विकारी
निराकार आत्मा अविकारी ।।३।।
अहंताच नसे नसे दंभ हिंसा
सुख दु:ख दोन्ही सारखीच ।।४।।
ज्ञान लाभल्याने शांति आत्मतृप्ती
सर्वाभूती देव अनुभूती ।।५।।
येता जाता कृष्ण प्रेमाने म्हणावे
ओलावा ज्ञानात जाणवेल ।।६।।
No comments:
Post a Comment