अध्याय १६ : दैवासुरसंपद्विभाग योग
देव दैत्य अशा जगी दोन जाती
सद्गुण दुर्गुण जाण खुणा ।।१।।
सरळ निष्पाप न्यायाचा तू पक्ष
घेतोस म्हणूनि आवडता ।।२।।
मी नि माझे गेले संपूर्ण लोपून
तोच परमार्थी जाणावे हे ।।३।।
सद्गुण तारती दुर्गुण मारती
काम क्रोध लोभ घातकी ते ।।४।।
कधी न वेगळा देवाच्या पासून
उत्कर्ष तयाचा ठरलेला ।।५।।
सद्गुण वेचावे दुर्गुण त्यजावे
पथ्य हे पाळावे ध्यानी धरी ।।६।।
No comments:
Post a Comment