अध्याय १५ : पुरुषोत्तमयोग
आदि अंत ज्याचा नसे कोणा ठावा
संसाराचा वृक्ष नवलाचा ।।१।।
खाली याच्या फांद्या मुळे ती वरती
कसा तोडण्याचा प्रश्न पडे ।।२।।
वासना हे मूळ उन्मूलन याचे
असंगाचे शस्त्र वापरावे ।।३।।
द्वंद्व संपताच मोकळा ये वारा
दिसे तसे नसे आभास हा ।।४।।
इंद्रियांचा स्वामी ज्याला होता आले
अंतरी पाहता देव दिसे ।।५।।
नश्वर शाश्वत याहून जो मोठा
उत्तम पुरुष तोच जाणा ।।६।।
ज्ञानी आणि भक्त देवाचा लाडका
स्वामी सेवकास शिरी धरी ।।७।।
No comments:
Post a Comment