Saturday, October 1, 2011

अध्‍याय १२ : भक्तियोग

अध्‍याय १२ : भक्तियोग

सगुण निर्गुण दोन्‍ही विलक्षण
भक्‍ती करावया मूर्ती हवी ।।१।।

हातून घडते जे जे दैवी काही
तेही समजावे कृपा त्‍याची ।।२।।

गोविंद गोविंद अमृतसागर
नाम आळवीता होते सुख ।।३।।

पार्थसारथी जो आपलाही तोच
जीवनाची सूत्रे त्‍याला द्यावी ।।४।।

भक्‍तीत भिजावे हरिगुण गावे
वाट पुढचीही तोच दावी ।।५।।

कथेचे श्रवण नामाचे कीर्तन
सोऽहंचे भजन अनुभवा ।।६।।

No comments:

Post a Comment