Thursday, October 6, 2011

अध्‍याय १७ : श्रद्धात्रयविभागयोग

अध्‍याय १७ : श्रद्धात्रयविभागयोग

ज्‍याची जशी श्रद्धा वागतो तो तसा

सात्विक तो भक्‍त भजे देवा ।।१।।

तामस राक्षस आहार तामसी

जाचक वर्तन असे त्‍याचे ।।२।।

सत्‍कर्मच असे यज्ञ तो पावन

सात्विका लाभते समाधान ।।३।।

ॐ कार उच्‍चार ब्रह्माचा उद्गार

शुभारंभ तोच सत्‍कर्माचा ।।४।।

तत् शब्‍द असे कर्माचा वाचक

सारे कर्म घडे त्‍याची कृपा ।।५।।

सत् शब्‍द असे ब्रह्म आळवाया

भाव समर्पण जीवेभावे ।।६।।

पूजेची सांगता नैवेद्याचा लाभ

देवाचा प्रसाद संजीवक ।।७।।

No comments:

Post a Comment