Thursday, October 16, 2025

शालामाता करीतसे संस्कार!


क्षणाक्षणाला शालामाता करीतसे संस्कार! 
देत ती तनामना आकार ! ध्रु.

हासत, खेळत, रमत शिकावे
सेवाभावी जीवन व्हावे 
उच्चाराला शोभा देतो सुंदरसा आचार!१

साधे जीवन, विसरुनि 'मी'पण
जनात मिसळुनि समूहजीवन
कसे जगावे, शिकण्या देते सेवेचा आधार!२

बी पेरावे, रोप डुलावे 
क्रीडांगण तर कल्लोळावे
विश्रांतीला कानी येतो वीणेचा झंकार!३

कृतज्ञ स्मित हे सद्‌गुरुपूजन
शैशव जपणे शाळाशिकवण
वंदन करणे आनंदाने मातेला उपहार!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment