तनामनाचे आरोग्य जपानेच जपायचे!ध्रु.
जप जपता जपता
रंग चढता चढता
तन असे भारावता देहदुःख विसरायाचे!१
नाम रूप दाखविते
नाम सद्गुण सांगते
झिजताना देवासाठी खोड चंदनी व्हायचे!२
नामी रामायण आहे
नामी भगवद्गीता आहे
नाम रसायन नामी सार साऱ्या आयुष्याचे!३
नाम जपत चालावे
नाम घेतच जेवावे
पथ्य शीलाचे पाळत समाधाने जगायाचे!४
बरे झाले रोग झाला
योग देवाशी साधला
देवाकारणीच आता देहाने या पडायाचे!५
होता आत्म्याचा निश्चय
झालो निवांत निर्भय
स्वरूपीच चिरकाल असे सानंद राह्याचे!६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.०५.२००४
No comments:
Post a Comment