अध्याय ११ : विश्वरुपदर्शनयोग
विश्वरुप पाहू ओढ लागलीसे
योग्यता आहे का पहा तूच ।।१।।
माधवाने दिली तया तैसी दृष्टी
विश्वरुप तया दाखवीले ।।२।।
आरंभी देखणे नंतर भयाण
पाहता पार्थाला फुटे घाम ।।३।।
राजस सुंदर साकार लोभस
मुकुंदच बरा सौम्य हो गा ।।४।।
आत बाहेरही सगळे व्यापून
उरला अनंत कळो आले ।।५।।
जन्म वर्धापन मरण श्रीहरि
देहभाव सारा लुप्त झाला ।।६।।
No comments:
Post a Comment