इतिहासाची आवृत्ती सारखी होत असते म्हणतात. ज्ञानदेवाची भूमिका ठरली पार्थाची! यावेळी निवृत्ती कृष्णमेघ होऊन ज्ञानावर बरसला - दाहक वणवा शांत शांत झाला. अवकाशात बासरीचे सूर उमटले - निवृत्तीने ज्ञानदेवांच्या अंत:करणाच्या मुरलीत फुंकर मारली. ज्ञानदेवाला कवित्वाविषयी प्रोत्साहन दिलं - जगाला मानवता धर्म शिकवण्याचे जीवित कार्य सांगितलं.
काय होतं निवृत्तीचं आवाहन?
------------oOo-------------
------------oOo-------------
ज्ञानोबा माझ्या ऐक ऐक बासरी
अंतरी नांदतसे श्रीहरी!ध्रु.
उपजतकवि तू तत्त्वज्ञानी
जा रंगुनिया भजनी गानी
जन्म-मृत्युची कशास चिंता?
कर्तव्या आचरी!१
कृष्णाष्टमिचा जन्म तुझा रे
मुखात तुझिया वेणुस्वर रे
जागव जागव कवित्वशक्ती
आज्ञा ही ईश्वरी!२
आवाहन कर सद्भावांना
सोड मूकता वद रे ज्ञाना
भजन निरूपण बरसो श्रावण
तृषार्त अवनीवरी!३
ऊठ पसर रे दोन्ही बाहू
दे आलिंगन मजसी भाऊ
वणवा आता नुरेल चित्ती
झरतिल अमृतसरी!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(तिलक कामोद)
No comments:
Post a Comment