प्रसाद पुष्पे - काय निवडून घेणार?
या उपाधिमाजी गुप्त। चैतन्य असे सर्वगत। ते तत्वज्ञ संत। स्वीकारीती।।
संत सार तेवढे नेमके घेतात. असार सहजपणे बाजूला सारतात. तिकडे बघतही नाहीत ते. कसे जमते त्यांना हे?
विवेकाने जमते. सद्गुरु हृदयात वास करतात आणि पावलोपावली जपतात, सन्मार्गावरच ठेवतात.
मी कोण? हे कळण्यासाठी मी कोण नाही हे सविस्तर कळले की काम भागले.
मी देह नव्हे, मी मन नव्हे, मी बुद्धी नव्हे. एकेक गोष्ट अंतरात चिंतनाने ठसत जायला हवी.
नामस्मरण चिंतनाला चालना देते.
प्रभाते मनी राम चिंतीत जावा. दिवसाच्या पहिल्या प्रहरात राम चिंतावा. आयुष्याच्या आरंभी, शैशवातच भक्त होता यावे.
लहानपणापासून हे संस्कार कथाकथन, भक्तिगीत गायन, स्तोत्र पठण, सूर्यनमस्कार, बलोपासना इत्यादी उपक्रमातून ठसविता येतील.
काय वाचायचे ते कळावे, काय पहायचे ते कळावे. जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे. सुपासारखे व्हावे. जनी वंद्य ते सर्व भावे करावे.
सार सार को गहि रहै। थोथा देइ उडाय।
लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

No comments:
Post a Comment