ऑडिओ - तुझे स्मरण राहु दे रामा -
तुझे स्मरण राहु दे! रामा! ध्रु.
असो अमीरी असो फकीरी
करी घडावी तुझी चाकरी
दास तुझा होउ दे!१
देह यातना सोशिन मोदे
गाइन भजना मी आनंदे
नाम मधुर गाउ दे!२
विषयचोर जर घरात आले
रोखित तव स्मरणाचे भाले
विघ्न चुरा होउ दे!१
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment