वरदविनायक। वरदविनायक!
जयजयकार करू! तुझा नित जयजयकार करू!ध्रु.
एकांताची मना आवडी
इथे यावया म्हणुनि तातडी
प्रतिपळ स्मरण करू! १
चालव अमुची ध्यानधारणा
बळ देई गा आत्मचिंतना
सोऽहं भजन करू! २
अनुसंधानी अम्ही असावे
हृदयनिवासी प्रभो वसावे
कर अंगीकारू! ३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.०९.१९७७
मधुवन्ती
#अष्टविनायक गीते
No comments:
Post a Comment