गिरिजात्मजा हृदयी धरा!
गणनाथ हे दुरिता हरा!ध्रु.
स्थान गिरीवर
अतीव शुभकर
पथि चालण्या कर हा धरा! १
गणेश लेणे
बहुत देखणे
मम अंतरी तुम्ही भरा! २
अपुले शैशव
विक्रम वैभव
गुणसागरा करुणा करा! ३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.०९.१९७७
#अष्टविनायक गीते
No comments:
Post a Comment