‘सावरकर’ मंत्र मनाला!
ही तीक्ष्ण धार खड्गाला! ध्रु.
ही तीक्ष्ण धार खड्गाला! ध्रु.
स्वातंत्र्यलक्ष्मी हा शब्द
तप करूनि हो उपलब्ध
जयनाद भेदी गगनाला!१
नमविती बंधु मृत्यूला
आगळा अर्थ जगण्याला
गुरुदत्त वंद्य सकलाला!२
मित्रांचा सजला मेळा
तो अभिनव भारत बनला
दिपवितात अग्निज्वाला!३
दुर्दम्य व्यक्तिमत्वे ही
उपमा न सापडे काही
घ्या चरित्र अभ्यासाला!४
जर चाड असे स्वत्वाची
चिंता या हिंदुत्वाची
सरसावा पुनरपि भाला!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.०७.२००९
No comments:
Post a Comment