हसत हसत बोल बोल
मधुर मधुर बोल बोल!ध्रु.
मधुर मधुर बोल बोल!ध्रु.
सुखव रमा मधुर वदुन
दुःख जाय दूर पळुन
वचनाचे थोर मोल! १
दुसऱ्यांना मान देत
स्नेहाचे श्रेय घेत
सांभाळी तूच तोल! २
शांतव मन बघुन गगन
तू प्रसन्न जग प्रसन्न
सकलांना आण डोल! ३
कपटा नच वश व्हावे
मौने मन निववावे
अविचारे कार्य फोल! ४
स्फूर्ति देत वंद्य होत
स्तुतिसुमने सौख्य देत
विचारून मधुर बोल! ५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
जून १९८३
No comments:
Post a Comment