आरति स्वामी समर्थांची, गाऊ भावभरे सारे
गाऊ भावभरे सारे, सदनच अक्कलकोट खरे ! ध्रु.
गाऊ भावभरे सारे, सदनच अक्कलकोट खरे ! ध्रु.
कुणाला डरायचे नाही, रतिभर हटायचे नाही
आता रडायचे नाही, लबाडा फसायचे नाही
प्रपंचात परमार्थी राहू सावधान सारे! १
दक्षता नित्याच्या कामी, रंगणे स्वामींच्या नामी
खरे सुख आपुल्याच धामी, ऐसे शिकवत श्रीस्वामी
स्वातंत्र्याचे, आनंदाचे भागिदार सारे! २
संगति सुंदर लागावी, शांतता जीवा लाभावी
संहरू संकट मायावी, निकड समयाची जाणावी
धीर धरू, सत्पथा वरू, यात्रेकरू सारे! ३
गर्जना मेघांची कैसी? चपळता चित्त्याची कैसी?
प्रखरता सूर्याची कैसी? तीक्ष्णता खड्गाची कैसी?
सद्गुण वेचू, सगळे नाचू अनुयायी सारे! ४
स्मरता दर्शन देतात, प्रसंगी कान उपटतात
शिव्यांची करती बरसात, कृपेची ती परि खैरात
काटे वरुनी फणसामध्ये असती गोड गरे! ५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment