Friday, April 8, 2022

मानसपूजा घ्‍यावी!

मानसपूजा घ्‍यावी! 
स्‍वामी मानसपूजा घ्‍यावी! ध्रु. 

हृदयकमलिं आपण बैसावे 
सोऽहं ध्‍यानी मने वसावे 
मुद्रा हृदयि ठसावी! १

द्वैत कल्पिले पूजेपुरते 
अद्वयत्‍व परि मन अनुभविते 
फळा सुफलता यावी! २

नमनासाठी कर हे जुळले 
अमन मनाचे नकळत झाले 
जवळिक अशी घडावी! ३

दृष्टिस पडता गुरुपदकमले 
आनंदाश्रू नयनी झरले 
फुले तयांची व्‍हावी! ४

सोऽहं रूपी कमळ उमलले 
मधुकर गुंजत सह‍जचि आले 
कोवळीक लाभावी! ५

ज्ञानमाउली प्रसन्‍न झाली 
अभंगातुनी ओवी हसली 
नित नवि सृष्टि दिसावी! ६

सोऽहं दीपे मन उजळावे 
मन उजळावे मन धवलावे 
आत्‍मप्रभा खुलावी! ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

No comments:

Post a Comment