रामा घालवि मम अभिमान!ध्रु.
गाइन तव महिमान!
मस्तक चरणी
अश्रू नयनी
राखी अनुसंधान!१
स्मरणि रहावे
धैर्य मिळावे
असशी सौख्यनिधान!२
तुझी प्रेरणा
सफल साधना
तू माझा यजमान!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन २५५ (११ सप्टेंबर) वर आधारित गीत.
अभिमान घालविण्यासाठी शरण जावे.
No comments:
Post a Comment