शिवरायांनी देह ठेवल्याचे कळले आणि समर्थ उदास उदास झाले. पैलतीर त्यांनाही दिसू लागले. काय खंत होती त्यांच्या मनामधली.
गुरूस सोडुन अर्ध्यावरती
शिष्य गेला पुढे!ध्रु.
शिष्य गेला पुढे!ध्रु.
सूर्य उगवता मावळणारा
क्षणभंगुर तर जगी पसारा
कीर्तिध्वज परि शिवरायाचा
वरती वरती चढे!१
श्रींची इच्छा उपाय नाही
शोक आवरी चित्ता पाही
जगी जगावे कवणासाठी
हेच पडे साकडे!२
ऐसा भूपति होणे नाही
दिसणे नाही, श्रवणे नाही
"वाढवि राजा" असे प्रार्थिता
ऐसे कैसे घडे?३
उपदेशाते कोण आचरिल?
पराक्रमे राज्यास वाढविल
अस्ताचलि रवि निघता का
ही किरणशलाका अडे?४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment