देव दयाळू बुडत्या भक्ता सदैव देताहे हात
भिऊ नको, मी तुझ्या पाठिशी स्वामी समर्थ वदतात!ध्रु.
भिऊ नको, मी तुझ्या पाठिशी स्वामी समर्थ वदतात!ध्रु.
अक्कलकोटनिवासी स्वामी अंतरात त्या शोधावे
श्रद्धा सुदृढ होण्यासाठी स्वामी समर्थ गर्जावे
आसू पुसती पाठीवरती फिरवतात प्रेमे हात!१
दुर्बलता तर चेटकीण ती पिटाळून तिज लावावे
गुरुकृपा ही जागृत होण्या नामानंदी रंगावे
प्रगतिपथावर नेई पुढती भगवद्गीतेचा पाठ!२
रुसवा मनचा निघून जाता कोरीच्या कोरी पाटी
वळणदार अक्षरे तिच्यावर मोत्यांच्या सुंदर पंक्ती
प्रयत्न आहे देव खरोखर यत्नाला यश दे साथ!३
जैसे द्यावे तैसे घ्यावे धकेचपेटे सोसावे
अंतरंग राखावे निर्मळ दुष्टांना नच वचकावे
लगाव रट्टे प्रसंग पडता असा दुजोरा देतात!४
हवी दक्षता क्षणाक्षणाला संरक्षाया संघ हवा
शांतीसाठी युद्धसिद्धता स्वातंत्र्याचा मंत्र नवा
निष्ठेला पर्याय न दुसरा स्वामी शिकवण देतात!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
६ जुलै २०००
No comments:
Post a Comment