प्रसाद पुष्पे - गमू पंथ आनंत या राघवाचा.
काय करावे? झोपच येत नाही पुन्हा. ठीक आहे, येत नसेल तर न येवो बापडी. हात पाय धुवू. देहाची सवय म्हणून चहा करून पिऊ या. पण नंतर? या मनाला काही सवय लावायला हवी का नको? समर्थ जसे म्हणाले आपणही निवांत वेळी त्याला सांगू या -
मना सज्जना भक्तिपंथेची जावे!
आपला श्वास - तो घेणे, उच्छ्वास टाकणे आपले आपल्याला ऐकू येईल इतकी शांतता आहे. जग थांबलेले नाही. अधूनमधून रस्त्यातील वाहनांचा आवाज येतच आहे कानावर!
पण ज्या अर्थी आज भगवंताने लवकर जाग आणली त्याअर्थी तो काही शिकवणार आहे आपल्याला.
प्रभाते मनी राम चिंतीत जावा!
रामाचे चिंतन! म्हणजे त्याच्या चरित्राचे अवलोकन! रामाच्या सद्गुणांचे स्मरण! रामनामसंकीर्तन!
नामसंकीर्तन साधन पै सोपे
जळतिल पापे जन्मांतरिची!
इतर वेळी हे वचन आठवले असते का आपल्याला?
बाहेरच्या जगाकडे लक्ष पुन्हापुन्हा जात असले तरी त्या धावणाऱ्या मनाला आतल्या जगाकडे लक्ष द्यायला लावायचे. म्हणून तर नाम घ्यायचे.
मना उलटता होते नाम! श्रीराम जयराम जय जयराम!
काळजी काळजाला कुरतडते, संशय वाढवते, भीतीचे निराशेचे साम्राज्य पसरते.
त्याच क्षणी हात जोडून भगवंताला विनवायचे -
तमसो मा ज्योतिर्गमय! मला अंधारातून प्रकाशाकडे ने.
केशवसुतांची सतारीचे बोल कविता वाचली असेल ना? तम अल्प, द्युति बहु असे सतारीच्या दीड् दा दीड् दा ने शिकवले.
विधायक विचार शांत करतात, रचनात्मक कार्य करण्याची प्रेरणा देतात. विघातक विचार विनाशाकडेच नेतात.
आपण सावध राहिले पाहिजे.
उतरणीवरून गडगडत खाली जाणे सोपे आहे. पण नेट धरून डोंगराची अवघड चढण चढणे आव्हान आहे.
ते आव्हानच पेलू या.
- श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:
Post a Comment