सूर्यनारायण प्रसन्न झाले. अदितीला फारा दिवसांनी मुलगा झाला. कश्यप ऋषींचा आश्रम आनंदाने उल्हसित झाला. दुर्वांकुरांचा पाळणा सजला. बारशाला स्त्रिया जमल्या. पाळणा जो जो म्हणून हलू लागला -
पाळण्याच्या मागे पुढे होण्याच्या लयीतच गीत गायले जाऊ लागले -
पाळणा हले, पाळणा हले!ध्रु.
वर्ण सावळा मूर्त ठेंगणी
नीर दाटले मातृलोचनी
भाळ भव्य हे, नेत्र सानुले!१
राष्ट्रनायका, हे विनायका
धीर द्यावया, तूच दीपिका
सार्थ व्हावया, नाव ठेवले!२
पक्षि कूजती, हरिण नाचती
पवन वाहता वृक्ष डोलती
सृष्टि हासते, आज तुजमुळे!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
जयजयवंती, दादरा (लहरी अशा)
No comments:
Post a Comment