देव मंदिरी; देव अंतरी, जाणिव या सत्याची
ही पूजा देवाची!ध्रु.
ही पूजा देवाची!ध्रु.
देहाचे आरोग्य राखणे
मन कोणाचे कधि न दुखवणे
स्मितसुमने देण्याची!१
घास भुकेल्या जिवास द्यावा
नारायण त्याच्यात पहावा
सहजकृती स्नेहाची!२
मधुर भाषणे घर हो मंदिर
स्वागतास तर सगळे तत्पर
आवड परिश्रमाची!३
स्तोत्रे गाता चाले चिंतन
चाले चिंतन तसे आचरण
संगति साधायाची!४
मी रामाचा, रामहि माझा
अंतरि सागर भावभक्तिचा
असल्या कल्लोळाची!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.०९.१९८९
No comments:
Post a Comment