समाधान मानावे, समाधान येते!ध्रु.
देह गुंतवा कामात, मना रंगवा नामात
चित्त शांत होते!१
देह गुंतवा कामात, मना रंगवा नामात
चित्त शांत होते!१
स्वस्थ बसावे निमिषभरी, मिटल्या नयना दिसे हरि
आई समजावते!२
दुजेपणा नाही, पक्षपात नाही
सद्गुरु सावरते!३
दिवसाकाठी चालावे, भजन करावे, करवावे
मंगलता हासते!४
डावे उजवे करू नये, भीतीने डगमगू नये
सखा राम भेटे!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(कुठलासा लेख वाचून सुचलेलं काव्य)
No comments:
Post a Comment