Sunday, April 9, 2023

ॐ नमः शिवाय! ॐ नमः शिवाय!

ॐ नमः शिवाय! ॐ नमः शिवाय! ध्रु.

गंगाधर हे सदाशिवा
महेश्वरा हे उमाधवा
शीत जाहली काय!१

विष आपण प्राशन केले
रामनाम ओठि आले
दुजा न काही उपाय!२

नंदीवरती आनंदी
विश्व आपणाला वंदी
द्या देवा चरणी ठाय!३

ध्यानाचा जडला छंद
आनंदाचा तो कंद
भक्त न सोडत पाय!४

शिवलीलामृत वाचावे
रहस्य आतुन उमजावे
मुला चालवी माय!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.०५.२००४

No comments:

Post a Comment