Sunday, April 16, 2023

जाणुनि घ्या भगवंता!

जाणुनि घ्या भगवंता!
जाणुनि घ्या भगवंता!ध्रु. 

देह नव्हे मी, आत्मरूप मी 
मी अवकाशी, अंतर्यामी 
तदाकार होताना आपण -
अनुभवाल अद्वैता!१

निर्गुण जैसा सगुण तसा ही 
वेदांसी ही अगम्य राही 
सहज प्रकाशित सर्व ठिकाणी 
वंदन करा अनंता!२ 

याचे पूर्वी कोणी नाही 
स्वेच्छेने हा बहुविध होई 
हा नटला विश्वाच्या रूपे 
तटस्थता ये वेदा!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.१२.१९७३
(यमन कल्याण, त्रिताल)

No comments:

Post a Comment