नाम घेता घेता राममय होऊ
गुरु रामचंद्र तिथे लीन होऊ!ध्रु.
गुरु रामचंद्र तिथे लीन होऊ!ध्रु.
चिंतन नामाचे
ध्यान श्रीरामाचे
गुरुबोध मानू गुरुपुत्र होऊ!१
गुरु सोऽहंध्यान
गुरु रामनाम
विघ्न रामरूप भावबळे पाहू!२
निश्चयाचे बळ
साधना सफल
राम देता दान किती किती घेऊ!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २५४, १० सप्टेंबर वर आधारित काव्य)
No comments:
Post a Comment