आरति नरसिंहाची गाऊ
आरति नरसिंहाची!ध्रु.
आरति नरसिंहाची!ध्रु.
अस्तित्वा आव्हान पोचले
क्रोधाची उसळली वादळे
प्रल्हादाच्या भक्तीसाठी
ऊर्मी प्रक्षोभाची!१
श्रीनारायण जय नारायण
जय जय नारायण नारायण
नामी वसते अपार ऊर्जा
अनुभूती सत्याची!२
उदरविदारण दुष्टपणाचे
संरक्षण हे सश्रद्धांचे
कणाकणातुन श्रीहरि भरला
शिकवण प्रल्हादाची!३
मी, माझे हे पार लोपले
तू नि तुझे हे उदया आले
ममत्व सरले कृपाच समजा
लक्ष्मी नरसिंहाची!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.०५.२०००
No comments:
Post a Comment