नामात रहावे, नीतीस धरावे!
नीतीत रहावे, रामास भजावे!ध्रु.
नीतीत रहावे, रामास भजावे!ध्रु.
राम सदय माउली
धरत शिरी साउली
श्रद्धेने रामनाम कंठि धरावे!१
शुद्ध मने भक्ति करी
अंतरि मग वसत हरी
हसत स्मरावे, स्मरत हसावे!२
शरण शरण रघुनाथा
टेकविला पदि माथा
हीण जळावे, मन उजळावे!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २१८ (५ ऑगस्ट) वर आधारित काव्य.
देव कसे आणि केव्हा साहाय्य करील याचा आपण कसा अदमास घेऊ शकू बरे? सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा. नीतीला धरून राहा. त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल. परमार्थात नीतीला, शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे. जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन, नामस्मरण करतो त्याला साहाय्य करण्यास परमेश्वर सदैव तत्पर असतो. आपण त्याला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागू या. तो दीनदयाळु भक्तवत्सल परमेश्वर आपल्यावर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा.
No comments:
Post a Comment