Monday, October 2, 2017

प्रसाद पुष्पे - २ ऑक्टोबर! गांधी जयंती!

प्रसाद पुष्पे - २ ऑक्टोबर! गांधी जयंती!

२ ऑक्टोबर! गांधी जयंतीचा दिवस! सत्य, अहिंसा, शांती या सद्भावांचा पुजारी! जगाने महात्मा म्हणून गौरवलेला माणूस!

विशेषत: दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांच्या हातून घडलेले कार्य अद्भुतच म्हणावे लागेल. सामान्य जनतेला निर्भय बनविले. खादीच्या प्रचारासाठी चरख्याचा प्रचार केला. सत्याचे प्रयोग केले आणि लिहिलेही.

"हिंदुस्थानची फाळणी" हे शल्य त्यांना शेवटपर्यंत आतून बाहेरून टोचतच राहिले. महाकाव्याच्या नायकाला शोभावे असे मरण त्यांना आले तेही प्रार्थना सभेला जात असताना!

पवित्र आचरण, सत्याचा आग्रह, स्त्रियांच्या आत्मबलाची जागृती, खेड्यात चला हा संदेश, शिक्षण पद्धतीबद्दल संशोधन, अनेक क्षेत्रात त्यांच्या चिंतनाची मौलिकता जाणवते.

आत्मशुद्धीसाठी त्यांनी केलेली उपोषणे त्यांच्या प्रमाणिकतेची साक्ष देतात.

दुर्दैव हे की गांधीजींसारखे महापुरुष त्यांच्या अनुयायांना कळलेच नाहीत.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

No comments:

Post a Comment