कशाला जगावे?
भगवंताने तुज पाठविले 'कार्य' करायाला
काय करू मी? कोण बनू मी? करी निर्णयाला!
'जोवर जीवन, हासत जगणे' शिकून घे मंत्र
फूल कसे वेलीवर डुलते शिकून घे तंत्र
सुगंध अपुला जगी उधळते सुखवी सकलाला
तू नच जगशी, श्रीहरि जगवी तो मोठी आई
हरि हरि जप रे तीच बालका आहे अंगाई
थकवा सरतो अनुसंधानी भजनी हरि भरला
तुझे कार्य ही श्रीहरि सेवा ते कसले कष्ट
जीवन आता ओझे नाही कर्मयज्ञ स्पष्ट
तव कर्माची पवित्र समिधा दे दे यज्ञाला
'मीपण' म्हणजे केवळ ओझे भिरकावुन दे ते
शिशुपण बरवे हृदया वाटे मनने ते मिळते
बाळ लाडका तू देवाचा ओळख अपणाला
तुझे कर्म ही सुंदर संधी देवाने दिधली
सफल होतसे आनंदयात्रा जर खेळीमेळी
उत्साहाने पार्थ कसा बघ कर्मा भिडलेला
- श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment