प्रसाद पुष्पे - आधी बीज एकले
संतांची जर कृपा असली तर साहित्यिक त्या संतचरित्राशी - संतसाहित्याशी इतके एकरूप होतात की त्यांच्या साहित्याला अभंगत्व प्राप्त होते.
'आधी बीज एकले' ही कै. शांताराम आठवले यांची काव्यरचना!
अभ्यासकांनी तुकाराम महाराजांच्या गाथेत शोध शोध शोधले पण मौज अशी 'तुका म्हणे ' अशी मुद्रा त्या रचनेत नाहीच.
दिसणारे भासणारे सर्व त्या अनंताचेच रूप
आधी बीज एकले। बीज अंकुरले, रोप वाढले
एका बीजापोटी। तरु कोटि कोटि।
कोटि जन्म घेती। सुमने फळे।
व्यापुनि जगता। तूही अनंता
बहुविध रूपे घेशी। परि अंती ब्रह्म एकले
आधी बीज एकले।
केशवराव भोळे यांचे संगीत आणि पागनीसांचा अभिनय व स्वर.
ती समरसता मला अच्युता
कधी एकदा देशिल का?
देणे घेणे सरले सगळे
मने मोकळा होईन का?
- श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:
Post a Comment