Sunday, October 8, 2017

प्रसाद पुष्पे - समर्थांचे काव्य! अनुभवाचा विषय !

समर्थांचे काव्य! अनुभवाचा विषय !

त्यांची तळमळ, मनाचा प्रांजळपणा, भावनांचा खळाळता प्रवाह, ओजो गुण, प्रासादिकता स्तिमित करून सोडतात.

श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा! ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा
नेत्री न ये रे तुजवीण निद्रा! कैं भेटसीबा मजला सुभद्रा

श्रीरामाचा वियोग किती असह्य झाला पाहा.

शिवराय छत्रपती झाले.  हिंदवी स्वराज्य स्थापन झाले तो आनंद कसा ओसंडतो पहा

बुडाला औरंग्या पापी, म्लेंच्छ संहार जाहला
उदंड जाहले पाणी, स्नानसंध्या करावया

आपल्या संपूर्ण काव्यामधून समर्थ आपल्या मनाचे आरस्पानी दर्शन घडवितात, आत्मारामाशी सुखसंवाद करतात, चालता बोलता दासबोध करतात आणि मनाची बाहेरची धाव थांबवून त्याला आत वळवून अनंत राघवाचा अनंत मार्ग चालून जाण्यासाठी मनोबोध रचतात.

करुणाष्टके, विविध देवांच्या आरत्या लिहाव्या समर्थांनीच.

रामदासांनी श्रीरामचंद्राला समर्थ म्हणून गौरविले - जय जय रघुवीर समर्थ! तर जनतेला हा रामाचा दासच समर्थ वाटला.  स्वामी वाटला.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment