एवढे दान दे आता
ते प्रेम शिकव भगवंता! ध्रु.
मन दुसऱ्याशी समरस व्हावे
परदु:खाने व्याकुळ व्हावे
लाजविण्या नवनीता!१
जनहितार्थ मी नित्य झटावे
उदात्त उन्नत मानस व्हावे
आतुर नित परमार्था!२
अपराधाचे स्मरण नुरावे
सोसायाला बळ लाभावे
क्षमाशील कर आता!३
अंतरातला विवेक जागव
कुविचारांचा कचरा घालव
केरसुणी दे भक्ता!४
नैराश्याचे नकोच वादळ
पूर्वग्रहांचे काळे बादल
हटवी बघता बघता!५
- श्रीराम बाळकृष्ण आठवले.
No comments:
Post a Comment